Latest Listings ( Less known Marathi Words )

झोलाझेंडी

ZolaZendi

Chauras, Zhadipatti

First Used in Zhadipatti. e.g. सगळा झोलाझेंडी कारभार आहे त्याचा.

मंडई

Mandai

Bhandara District, Gondia District, Chandrapur District

It is used as equivalent word for जत्रा in Chauras and Zadippati region.

रपटा

Rapta

Chauras

A small temporary bridge on river made of branches and mud when water is less.

डूख धरणे

Dukh Dharane

Bhandara District, Gondia District, Chandrapur District

बदला घेण्यासाठी एखादी गोष्ट मनात साठवणे.

मोहतेल

Mohtel

East Vidarbha, Mainly in Bhandara, Gondia, Chandrapur District

This is equivalent word for मोहारू, मधाचे पोळे.

काऊन

Kaun

Vidarbha

का ? or का बरं याअर्थी विदर्भात काऊन असा शब्द वापरला जातो.

काऊन बाई अशी, तर सवयच तशी

Kaun Bai Ashi, Tar Sawayach Tashi

East Vidarbha

म्हणजे वारंवार सांगूनही वर्तन न सुधारणे.

दांगडो

Dangado

Rural Maharashtra, Vidarbha

गोंधळ

बयताड

Baytaad

Vidarbha

मूर्ख

बक्कळ

Bakkal

Rural Maharashtra

खूप, पुष्कळ

पांदण

Paandan

Vidarbha

दोन कुपंणा मधील गाडीवाट, पांदण रस्ता, छोटा रस्ता

कलागत

Kalaagat

Rural Maharashtra

भांडण

वांढरु

Waandhru

Vidarbha

माकड, माकू.

दिवड

Diwad

Rural Maharashtra

अजगर

लडतरे

Ladtare

Rural Maharashtra

थोडक्यात अर्थ भानगडी

तोंडपाटीलकी करणे

Tondpatilki Karne

Maharashtra

फक्त मोठ्या बाता करणे.

निवसणे

Niwasane

Rural Maharashtra

गहू निवासला = गव्हाला उम्बया फुटू लागल्या

काशी करणे

Kaashi Karne

Maharashtra

घोळ घालणे, पंचाइत करणे

करांडा

Karanda

Rural Maharashtra

कुंकू ठेवायची डबी.

रग्गड

Raggad

Rural Maharashtra

जास्त, खूप.

खराटा

Kharata

East Vidarbha

वाळलेल्या तुरीच्या काड्यांची बनवलेली झाडणी / झाडू .

इच्चकदागो

Ichchakdago

Bhandara District, Chandrapur District

खोडकर

इसळ्यान

Islyaan

Gondia District, Bhandara District

मास्यांचा/माशांचा ( fish ) वास, odor of fish

झ्यामल झ्यामल करणे

Jhyamal Jhyamal Karane

Chandrapur District, Bhandara District

एखाद काम करत आहे अस दाखवणे, पण Output काहीच नसणे. e.g. काय झ्यामल झ्यामल करत आहेस बे ?

बेस

bes

Bhandara District, Chandrapur District

e.g. कसा आहे माल ? बेस आहे. बेस म्हणजे 'बरा'/'चांगला'.

मुखूर मुखूर हसणे

Mukhur Mukhur Hasane

East Vidarbha

म्हणजे गालातल्या गालात हसणे किंवा मनातल्या मनात हसणे.

बारोमास

Baaromaas

East Vidarbha

बारा महिने किंवा वर्षभर.

उलूशी

Ulushi

Rural Maharashtra

थोडीशी, Less

कलदार

Kaldaar

Vidarbha

१ रुपयाचं नाणं

बया

Baya

Bhandara District

वेडा, मूर्ख

शेल्यावरचा

Shelyawarcha

Bhandara District

शेवटचा

करतूक करणे

Karatuk Karane

East Vidarbha

करणी करणे

लावळीन

Laavaleen

East Vidarbha

हडळ, Lady ghost

बूचकाळणे

Bhuchkalne

Bhandara District

पाण्यात बुडवणे

ढोला

Dhola

Bhandara District

पाण्याची मोठी टाकी, जिथून पाणीपुरवठा होतो.

डोंगा

Donga

East Vidarbha

नाव, लांब होडी. नदीमधे वापर होतो.

भंजवने

Bhanjawane

Sangadi, Sakoli Taluka, Bhandara District

मूर्ख बनवणे . e.g. आम्हाला भंजवू नको तू.

टोंगरा

Tongara

Bhandara District

टोंगरा = गुडघा

मनिला

Manila

Bhandara District

मनिला = सदरा. ( Shirt )

चून

Chun

Bhandara District

चून = बेसन चून - powerd of chickpeans. शु.म. बेसन वा.उ. - 1. भाऊ थांब आजच्या दिवस चून भात खाऊन जा गरीबाच्या घरून

लूप लूप करणे

lup lup karne

Bhandara District

घाबरणे. e.g. समोर वाघ दिसल्यावर माझी छाती लूप लूप करत होती.

डवूर

Dawur

Bhandara District

डवूर - muddy शु. म. - गढूळ वा.उ. - 1. अबे, नयराचा पाणी खूपच *डवूर* आहे, पोवाले नोको जाऊ. 2. खेळमे, त्या *डवऱ्या* पाण्यात जाऊनसन्या कपडे धुवाले संगतस का वो मले!!!!

झुरवा

Zurava

Bhandara District

झुरवा (noun) - thin gravy in any meal preparation शुद्ध मराठी- रसा... वाक्यात उपयोग - 1. भाऊ, झुरवा झुरवा वाढजो गा मले... 2. मले झुरवा भात बी भेटला तरी चालते जेवनाल...

ठुसा

Thusa

Bhandara District

ठुसा (noun) - piece of meat शु.म.- नॉन व्हेज जेवणातील मांसाचा तुकडा वा उ - 1. एक ठन ठुसा न ढेरभर रस्सा... 2. ठुसा दे भाऊ झुरवा नोको देऊ..

बाक्का

Bakka

Bhandara District

बाक्का (adjective) - awesome, nice, amazing शु.म. - छान, सुंदर वा उ - 1. "कसा ? बाक्का आहेस नं ? 2. लग्नाले गेलो होतो लाखोरीले, जेवण बाक्का होता

बख्खल

Bakhkhal

Bhandara District

बख्खल (adjective) - this word has varied meaning depending on where it's used, primary meaning is Fat, thick शु.म. - जाड, दाट वा उ - 1. माया घरची चादर मस्त बख्खल आहे, थंडी नायी लागे... 2. का बख्खल आहे तो, कितिबी मारला तरी नायी लगे त्याले कायीच...

चिला

Chila

Bhandara District

चिला - Muscinae शु. म. - शेवाळ वा.उ. - 1. कासवाचा जेवण *चिला* होये बरं 2. डोबानीत तं बहुतच *चिला* संगरला गा!!

सुलुप

Sulup

Bhandara District

सुलुप - side of regular road शु. म. - रस्त्याच्या कडेने वा.उ. - 1. *सुलपा सुलपानं* जाजो गा आजा 2. तो तुले *सुलपावरच* भेटल पुड्या खात, पायजो कदी!!!

मासरी

Masari

Bhandara District

आजचा शब्द - मासरी मासऱ्या - fish शु. म. - मासा, मच्छी, मासळी वा.उ. - 1. मुजबीच्या बाजारातलीच *मासरी* सवाद लागते 2. कोणतीही *मासरी* चालल, पण ते चाचडी नोको आणजो, फेसंड लागते

खेदाळणे

Khedalane

Bhandara District

हाकलून लावणे वा.उ. - 1. चाल बंदरा खेदाळावल येतेस का वावरी

कला करणे

Kala Karane

Bhandara District

कला करणे = to be angry शु. म. - रागावणे वा.उ. - 1. लवकर येजो नाहीत मंग माई मा कला करते

हेंदडा

Hendada

Bhandara District

हेंदडा - dirty शु. म. - गलिच्छ वा.उ. - 1. येवढाई *हेंदडा* पोरगा नाई पायला कदी 2. बादल्या, एवढा हेंदडा काऊन रायतस बे?

शिसुली

Shisuli

Bhandara District

शिसुली- wistle(a small metal or plastic tube u blow into a long high sound or music) शु. म. - शिटी वा.उ. - 1. अबे गावामधी पयले चोरी होये न त पोलीस रातच्यान *शिसुली* वाजवत गाडी न फिरत. 2. तुयापेक्षा माई तोंडानं चांगली *शिसुली* वाजते बे.

पोतारा मारणे

Potara Marane

Bhandara District

समानार्थी शब्द- सारवने पोतारा मारणे (verb) - coloring the wall or floor using whitewash or cow dung शु. म. - चुन्याने किंवा शेणाने भिंतींना/घरातील तळ भागाला सफेदी करणे वा.उ. - १. दिवाळीत घराले *पोतारा* तं मारावाच लागंल २. *पोतारे* मारावचे दिवस

चवण्या

Chavanya

Bhandara District

चवण्या (noun) - excuses शु.म. नखरे, सोंग वा उ - 1. खावाले भेटते तं चवण्या करता, तुमच्या एवढे होतो तं खावाले नवता भेटत आमाले 2. चांगल्यानं बोलवाले गेलो जास्तच चवण्या करून रायला

खकाना

Khakaana

Satara District

Dust, धूळ. e.g. टेबलावर किती खकाना साठलाय.

बया

Baya

Bhandara District

Don't confuse with अगं बया बया (adjective) - mad, idiot - शु.म. वेंधळा वा उ - 1. बया सारखा नोको बोलू 2. का बया झालास का गा

डेंगडेंग

DengDeng

Bhandara District

डेंगडेंग (verb) - irritate someone शु.म. कटकट, तगादा लावणे Similar to लेम्बडिझड वा उ - 1. हे तुयी रोज ची डेंगडेंग बंद कर 2. सकाळी उठलं नाही का तुयी डेंगडेंग सुरु

भोकणटिकला

Bhokantikla

Bhandara District

भोकणटिकला - blind (generally speak angrily to non-blind) समानार्थी शब्द: भोकणा, अंधरा शु.म. आंधळा (डोळस व्यक्तीस रागाने उच्चारण्यात येणारा शब्द). वा.उ. - 1. *भोकणटिकले* ते कोंटयातली फराकही दिसे नाई का तुले? 2. पक्काच *भोकणटिकल्या* दिसते बे हा

झिल्ली

Zilli

Bhandara District

Carrybag,plastic cover शु.म.- मला माहीत नाही पण मराठी मधे सगळे पाॅलिथीन म्हणतात. वा.ऊ.- 1) भाऊ अजून एक झिल्ली देजो गा (at the meat shop) 2)अबे झिल्ली गिल्ली मंधी भर न (anything)नाई त सांडल न

पजव

Pajav

Nagbhid Taluka, Chandrapur District

पजव (Verb) - to instruct someone to drive as much as fast शु.म. पळव, वेगाने जाणे वा.उ. - 1. पोहचून का नाही आज, पजव का बे.

पुचुक

Puchuk

Nagbhid Taluka, Chandrapur District

पुचुक (Verb) - to creat disturbance. शु.म. मधात आपले पणा करणे.. वा.उ. - 1. कायले मधीतच पुचुक पुचुक करतेस बे..

कोंटा

Konta

East Vidarbha

कोपरा, गावाच्या कोंट्या वर घर आहे त्याचे.

लिचोंडा

Lichonda

East Vidarbha

चिमटा घेणे. e.g. कायले लिचोंडा घेऊन राहिला बे.

कोनोळा

Konola

East Vidarbha

कोनोडा, कोपरा... e.g. कोनोळ्यात ठेवला आहे तिथे ... ( म्हणजे खोलीच्या एखादया कोपऱ्यात ठेवले आहे )

सब्बल

sabbal

East Vidarbha

लोखंडी पहार या शब्दासाठी वापरण्यात येणार समानार्थी ग्रामीण शब्द.

रद्दाड

Raddad

East Vidarbha

अतिशय खराब प्रतीचा. उदा. काय रद्दाड माल आहे .

जीव उलार - वालार होणे

ular walar

Bhandara District, Chandrapur District

जीव घाबरणे, किंवा खूप अस्वस्थ वाटणे. उदा. ऊन ( तपन ) हो का काहोजी हे, जीव कसा उलार - वालार लागून राहिला आहे !

कोथरा

Kothara

bhandara district, chandrapur district

कोथरा म्हनजे मच्छि / मासे पकडण्यासाठी वापरण्यात येनारा कांबीचा किवा लाकडा पासून बनलेली जाळि /कठडा.